Production and History of Films in Sanskrit संस्कृत भाषेत चलचित्रपटांची निर्मिती व इतिहास
Production and History of Films in Sanskrit
संस्कृत भाषेत चलचित्रपटांची निर्मिती व इतिहास भारतीय कला आणि संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणजेच चित्रपट होय. १९१३ साली स्वदेशी चित्रपट निर्मितीला सुरवात झाली. त्यानंतर आजपर्यंत भारतात अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली जाते. संस्कृत भाषेत एकुण १४ चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यापैकी बहुतेक चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
संस्कृत भाषेत अनेक लघुचित्रपटांची देखील निर्मिती झालेली आहे. लघुचित्रपटांचे विषय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे विविधांगी आहेत. वेगवेगळया संस्कृत विद्यापिठाकडून तसेच राष्ट्रीय तसेच खाजगी संस्कृत संस्थांकडून दरवर्षी विविध स्पर्धा आयोजित करुन लघुचित्रपट निर्मिती करीता प्रोत्साहन दिले जाते. त्याचे परिणाम स्वरुप संस्कृत लघुचित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढत आहे.
भारत देश हा चित्रपट प्रेमी देश म्हणुन ओळखला जातो. चित्रपट उद्योग हा भारतातील एक मोठा उद्योग आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट उद्योग भारतात चालतो. भारतीय कला आणि संस्कृती यांचा अविभाज्य घटक म्हणजेच चित्रपट होय.
चित्रपटांचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही प्रभाव भारतीय जनमाणसात बघायला मिळतो. म्हणुनच बदलत्या काळानुसार चित्रपटाचे स्वरुप सुध्दा बदलत गेले आहे. संस्कृत भाषेत चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे. आजपर्यंत.
भारतातील चित्रपट निर्मितीचा इतिहास
१९१३ साली दादासाहेब फाड़केनी ‘राजा हरिशचंद’ हा पहिला स्वदेशी मुक चित्रपट निर्माण केला. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच १९२२ मध्ये कलकत्ता मध्ये चित्रपट प्रदर्शनावर भारत सरकारने प्रथमच मनोरंजन कर लावला. १९३१ साली पहिला बोलपट ‘आलम आरा’ निर्माण झाला.
या बोलपटाच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपट सुष्टीच्या सुवर्णकाळाला सुरवात झाली. यानंतर विविध चित्रपट उद्योगांना सुरवात झाली, यातूनच चित्रपटांची निर्मिती होवू लागली. काही काळानंतर रंगीत चित्रपटांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. अनिमिटेड चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली गेली.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी निर्माण होणाऱ्या चित्रपटांचा प्रभाव भारतीय जनतेवर प्रकर्षाने दिसून येतो. त्यावेळी निर्माण झालेल्या अनेक चित्रपटामधून आणि त्यातील गीतांमधून भारतीयांना स्वातंत्र्य लढयाकरीता प्रेरणा मिळत असे. उदाहरण द्यायचे झाले तर १९४३ साली निर्माण झालेल्या ‘किस्मत’ चित्रपटातील गाणे ‘दुर हटो ऐ दुनियावालो’ हे गाणे स्वातंत्र पूर्व काळात भारतीय जनतेत लोकप्रिय आणि प्रेरणादायी ठरले. अशाप्रकारे भारतात चित्रपटांची निर्मिती आणि प्रेक्षकांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेली.
१९४७ सालानंतर चित्रपट निर्मिती
भारत स्वातंत्र झाल्यानंतर भारतीय चित्रपट निर्मितीने आणखी वेग धरला, कारण स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपट निर्मितीमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे चित्रपट अधिक लोकप्रिय होवू लागले. इंग्रजांच्या काळात चित्रपट निर्मिती करतांना ज्या बंदी लादल्या जायच्या स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांचा लोप झाला.
त्यामुळे चित्रपट निर्मितीतील स्वातंत्र्य वाढले. कालांतराने भारतात अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करणाऱ्या औद्योगिक संस्था उदयाला आल्या. जसे की हिंदी, मराठी, तामीळ, तेलगू, बंगाली, कन्नड, ओडीसी, गुजराती, पंजाबी, इत्यादी अनेक भाषामधून चित्रपट उदयोग निर्माण झाले, तसेच विविध भाषामध्ये चित्रपट निर्माण होवू लागले.
त्यापैकी हिंदी, चित्रपट सुष्टी, म्हणजेच बॉलिवूड, आणि तामिळ चित्रपट सुष्टी, म्हणजेच कॉलीवूड हे दोन चित्रपट उद्योग प्रसिध्द आणि यशस्वी ठरले. चित्रपटांसोबत चित्रपटातील संगीत, गीत, नृत्य यांचा देखील विकास झाला. अश्याप्रकारे स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपट निर्मिती उद्योगाने प्रगती साधली.
भारतात आतापर्यंत संस्कृत भाषेत एकूण १४ चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
हे सर्व चित्रपट भारत स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण झालेले आहेत. संस्कृत भाषेत चित्रपट निर्माण करणारा स्वतंत्र चित्रपट उद्योग नाही. तरी सुध्दा दक्षिण भारतातील काही संस्कृतानुरागी चित्रपट निर्मात्यांनी संस्कृत भाषेत चित्रपट निर्मिती केले आहेत.
या चित्रपटांमध्ये पौराणिक संस्कृत ग्रंचावर आधिरीत, ३ डी, अॅनिमेटेड, लहान मुलांकरीता असलेले विषय, असे विविध विषयांवर आधारीत चित्रपट समाविष्ट आहे. हयातील प्रत्येक चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार मिळालेले आहे. काही चित्रपटाचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये करण्यात आलेले आहे.
संस्कृत चित्रपटासोबतच त्यातील गीत, संगीत आणि नृत्य हे देखील दर्जेदार आणि मनोरंजक आहे. हयापैकी काही चित्रपट व्यावसायिक असून हे चित्रपट विविध प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यात आलेले आहेत.
संस्कृत चित्रपटांची यादी चित्रपट निर्मितीच्या सालानुसार खालीलप्रमाणे आहे
वर्ष | चित्रपटांची नाव | चित्रपट निर्माता |
१९८३ | आदि शंकराचार्य | जि.व्ही. अय्यर |
१९९३ | भगवद गीता | जि.व्ही. अय्यर |
२०१५ | प्रियमानसम् | विनोद मानकर |
२०१६ | इष्टिः | जी.प्रभा |
२०१७ | सुर्यकांत | एम. सुरेंद्रन |
२०१७ | अनुरक्ति | पी. के. अशोकन |
२०१९ | मधुरस्मितम् | सुरेश गायत्री |
२०२० | पुण्यकोटि | रविशंकर वी. |
२०२० | अगोचर्याणव | पूर्णिमा आर अय्यर |
२०२१ | प्रतिकृति | डॉ. निधीश गोपी |
२०२१ | नमो | विजिश मामिक |
२०२१ | समस्या | शिबू कुमारनल्लूर |
२०२१ | शाकुंतलम् | दुष्यंत श्रीधर |
२०२२ | भगवदज्जुकाम् | यदु विजयकृष्णन |
संस्कृत भाषेतील निर्माण झालेल्या चित्रपटाची सविस्तर माहिती
पहिला चित्रपट आदि शंकराचार्य
हा संस्कृत भाषेतील पहिला चित्रपट असून या चित्रपटात आठव्या शतकातील दार्शनिक आदि शंकरचार्य यांचे जीवन आणि विचार लोकांपर्यंत पोहचविले आहे. कन्नड चित्रपट उद्योगद्वारा निर्मित केल्या गेलेल्या या चित्रपटात बंगाली नट सर्वदमन डी बॅर्नजी यांनी मुख्य भुमीका साकारली आहे. ३१ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ४ पारितोषिके मिळाली, सर्वोकृष्ट चित्रपट, चित्रीकरण, स्किन ल्पे, ध्वनी असे पुरस्कार देवून या चित्रपटाला सन्मानिम करण्यात आले.
दुसरा चित्रपट भगवद गीता
आदि शंकराचार्य नंतर जि. व्ही. अय्यर यांनी भगवत गीता या दुसरा संस्कृत चित्रपट निर्माण केला. आध्र प्रदेश फिल्म चेम्बर, ऑफ कॉमर्स आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये प्रदर्शीत केला गेलेल्या या चित्रपटाला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
तिसरा चित्रपट प्रियमानसम्
हा चित्रपट भारतीय पौराणिक कथा किंवा वेद याव्यतिरिक्त विषयावर बनलेला असून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
झालेला आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता.
चौथा चित्रपट इष्टिः
याचा अर्थ स्वताःचा शोध असा होतो. केरळच्या पृष्ठ भूमिवर बनलेला हा दुसरा चित्रपट होय. हा चित्रपट सामाजिक मुद्दयावर आधारीत आहे. जसे की जातीवाद, महिलांचे दमण, आणि इतर सामाजिक वाईट अंग. या चित्रपटाला गोवा येथे आयोजित चित्रपट महोत्सवात भारतीय पैनोरमा श्रेणी मध्ये दाखविल्या गेले होते.
पाचवा चित्रपट सुर्यकांत
हा चित्रपट २०१७ मध्ये केरळ चित्रपट समिक्षा समिती समारोहात स्पेशल ज्युरी पारितोषिकाने सन्मानित करण्यात आला होता.
सहावा चित्रपट अनुरक्ति
हा भारतातील पहिला संस्कृत त्रिमीती म्हणजेच ३ डी चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात पहिल्यांदाच संस्कृत गाण्याचा समावेश करण्यात आला. या चित्रपटात पंजाबी नर्तकाची कथा आहे, जो केरळला येवून लोकनृत्य कूडियाट्टम शिकतो.
सातवा चित्रपट मधुरस्मितम्
हा जगातील पहिला लहान मुलांसाठी बनलेला संस्कृत चित्रपट आहे. सुरेश गायत्रीद्वारा निर्देशित हा पहिला चित्रपट असून यात सरकारी शाळा आणि शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली बाजू दाखविलेली आहेत. राजस्थानच्या पहिल्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला प्रदर्शित करण्यात आले होते.
आठवा चित्रपट पुण्यकोटि
संस्कृत भाषेत बनलेला पहिला हलणाऱ्या चित्रांचा म्हणजेच अॅनिमेटेड चित्रपट आहे. कन्नडच्या एका लोकगीतावर आधारित हा चित्रपट असून यात पुण्यकोटि नावाच्या नेहमी खरे बोलणाऱ्या गायीची कथा दाखविण्यात आलेली आहे.
नववा चित्रपट अगोचर्याणव
कर्ण पर्ववर आधारित हा संस्कृत हिंदी चित्रपट आहे. अडीच तासांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील विविध भागात करण्यात आलेले आहे.
दहावा चित्रपट प्रतिकृति
हा चित्रपट भारतातील पहिला संस्कृत व्यावसायिक चित्रपट आहे. जो ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला होता.
अकरावा चित्रपट नमो
हा चित्रपट राजा आणि त्याची प्रजा यांच्यातील संबंध दाखवितो चित्रपटाची सुरवात आधुनिक काळापासून होते आणि पुढे हो कथा पौराणिक काळाकडे वळते. ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला होता.
बारावा चित्रपट समस्या
नावाप्रमाणेच या चित्रपटात समस्या आणि समाधान यांच्या विषयी चर्चा केलेली आहे. हा चित्रपट पर्यावरणाबाबत समस्यांवर भाष्य करतो. निस्ट्रीम या ओटीटी प्लॅटफार्म वर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे, तो आपण इंग्रजी आणि हिंदी उपशिर्षक म्हणजेच सबटायटल सह बघू शकतो.
तेरावा चित्रपट शाकुंतलम्
कवि कुलगुरु कालिदास विरचित अभिज्ञान शाकुंतलम् या ग्रंथावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय आकर्षक पध्दतीने करण्यात आलेले आहे. या चित्रपटातील गीत, संगीत आणि नृत्य अतिशय मनमोहक आणि वाखाणण्याजोगे आहे.
चौदावा चित्रपट भगवदज्जुकाम्
हा चित्रपट सातव्या शतकातील नाटाकावर आधारित आहे यात बौध्द साधू आणि त्यांचा शिष्य शांडील्य ची कथा आहे. IMDB वर 9.3. ची रेटींग आहे. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
संस्कृत भाषेतील चित्रपटांचा प्रभाव
चित्रपटांचा समावेश कला आणि संस्कृती यांनमध्ये होत असल्याने त्या त्या भाषेतील चित्रपट हे त्या त्या भाषेतील समृध्दता दर्शवितात. संस्कृत भाषेत निर्माण झालेले चित्रपट जरी संख्येने कमी असले तरी दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कलाकृतीचे दयोतक आहे.
चित्रपटातील संगीत आणि नृत्य अतिशय सुमधून आणि रमणीय आहे. संस्कृतातील सर्वच चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. हे सर्व चित्रपट म्हणजेच भारतीय समाज, संस्कृती, कला तसेच संस्कृत साहित्याचे जणू काही प्रतिबिंबच आहे.
२०२१ नंतर संस्कृत चित्रपट निर्मितीच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. यातील बरेचशे चित्रपट यूटयुचवर सहज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विविध ओटीटी माध्यमावर सुध्दा संस्कृत चित्रपट उपलब्ध आहेत. अश्याप्रक/कृत भाषेतील चित्रपटांचा विविध स्तरांवर प्रभाव दिसून येते.
संस्कृत लघु चित्रपटांची माहिती
कमी कालावधीचा आणि प्रभावीपणे विषय मांडणाऱ्या चित्रपटांना लघु चित्रपट म्हणतात. लघु चित्रपटांचे वैशिष्टय म्हणजे हे चित्रपट कमी खर्चात व मर्यादीत साधनांमध्ये देखील निर्माण करणे शक्य होते. त्यामुळे चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश करु इच्छिणाऱ्या युवकांना लघु चित्रपट निर्मिती केल्यामुळे चित्रपट निर्मितीचा अनुभव घेणे सोपे जाते.
संस्कृत भाषेत अनेक लघु चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यापैकी काही चित्रपट विविध राष्ट्रीय संस्कृत संस्था तसेच खाजगी संस्कृत संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या लघुचित्रपट स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेले लघुचित्रपट आहेत.
इतर काही संस्कृतानुरागी लोकांनी यूटवूच माध्यमांवर तयार केलेले भित्रभित्र विषयांवर आधारित असे लघुचित्रपट आहेत राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, संस्कृत भारती, इत्यादी संस्कृत संस्थाद्वारे संस्कृत लघु चित्रपट निर्मिती स्पर्धा घेतल्या जातात.
या स्पर्धाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लघु चित्रपटांची निर्मिती करण्याचे प्रोत्साहन मिळते आणि त्यायोगे संस्कृत चित्रपटांचा पायादेखील रोवला जातो. विविध स्तरांवरील अनेकविध प्रयत्नामुळे संस्कृत लघुचित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढत आहे.
त्यामुळे संस्कृत चित्रपट निर्मितीला सुध्दा चालना मिळेल अशी आशा पल्लवीत होत आहे. येणाऱ्या काळात अधिकाधिक संस्कृत लघुचित्रपट तसेच चलचित्रपट यांच्या निर्मितीत वाढ होईल. तसंच संस्कृत चित्रपट बाणान्या प्रेक्षकांची देखील वाढ होईल असे निश्चितपणे मागता येईल.
१९८३ ते आजतागायत संस्कृत भाषेत एकूण १५ चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. हे सर्वच चित्रपट अतिशय दर्जेदार सोबतच मनोरंजन देखील आहेत. या सर्वच चित्रपटांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार मिळालेले आहे.
गेल्या दोन तीन वर्षात संस्कृत चित्रपटांच्या निर्मितीत बोडया प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. लघुचित्रपट निर्मितीच्या विविध स्पर्धामुळे संस्कृत लघुचित्रपट निर्मितीची संख्या देखील वाहत आहे. ही सर्व परिस्थिती बघता संस्कृत चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाणे वाहावे तसेच संस्कृत चित्रपट पाहाणाज्या प्रेक्षकाची संख्या वाढावी याकरिता सर्व स्तरांवर अधिक प्रयान होणे अतिशय आवश्यक आहे असे घडल्यास संस्कृत चित्रपटांचा सुवर्ण काळ येण्यास मदत होईल.
Image Credit :- Central Sanskrit University
Great 👍 Very useful information
श्वेता महोदया, तुमचं विशेष अभिनंदन. आपण दिलेली माहिती अत्यन्त उपयुक्त आहे. आपला शोधनिबंध अनेक संशोधकांसाठी अभ्यसनीय ठरेल यात शंकाच नाही.
पुनश्च एकदा अभिनंदन आपलं. 🌹🌹🌹🌹🌹